चार जणांच्या टोळक्याची ट्रॅव्हल कंपनीच्या मालकासह कामगाराला मारहाण

राजमुद्रा ट्रॅव्हल कंपनीची बस काळेवाडी फाटा येथे प्रवासी भरण्यासाठी उभी होती. कंपनीचा कामगार ज्ञानेश्वर सगर हा प्रवाशांना बसमध्ये बसवत होता. यावेळी बसच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या आरोपी साळवी याला सगर यांनी बाजूला होण्यास सांगितले. त्यावरून साळवी याने सगर यांना धक्काबुक्की केली

    पिंपरी: ट्रॅव्हल कंपनीच्या मालकासह कामगाराला चार जणांच्या टोळक्याने कोयता व दगडाने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी अशोक मुकुंद मोरे (रा. अंबेजोगाई, बीड) याला अटक केली आहे. किरण उत्तम लोंढे (वय २६, धनगरबाबा मंदिर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी किरण यांची राजमुद्रा ट्रॅव्हल कंपनीची बस काळेवाडी फाटा येथे प्रवासी भरण्यासाठी उभी होती. कंपनीचा कामगार ज्ञानेश्वर सगर हा प्रवाशांना बसमध्ये बसवत होता. यावेळी बसच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या आरोपी साळवी याला सगर यांनी बाजूला होण्यास सांगितले. त्यावरून साळवी याने सगर यांना धक्काबुक्की केली. फिर्यादी लोंढे हे साळवी याला समजावून सांगत असताना त्याने आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. दगड उचलून लोंढे यांच्या पायावर मारला. तसेच कोयत्याने वार केला. लोंढे यांचा मावस भाऊ सचिन फावडे यालाही मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करत आहेत.