शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ६० फूट उंचीचे भव्य चित्र

सातारा येथील ऐतिहासिक सभेत भर पावसात सभेला मार्गदर्शन करतानाच्या भिंतीवर उभारलेली भव्य दिव्य पेंटिंग ही शहरातील नव्या पिढीला आणि सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील नारायण पेठेत एका इमारतीवर भव्य चित्र रेखाटण्यात आले आहे.या चित्राचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सातारा येथील ऐतिहासिक सभेत भर पावसात सभेला मार्गदर्शन करतानाच्या भिंतीवर उभारलेली भव्य दिव्य पेंटिंग ही शहरातील नव्या पिढीला आणि सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

 

रमणबाग चौक येथे शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. या पेंटिंगच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार संजय शिंदे, चेतन तुपे पाटील, पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी प्रवक्ते व माजी महापौर अंकुश काकडे, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, दत्ता सगरे,संजय पालवे, अप्पासाहेब जाधव तसेच महाविकास आघाडीचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.