धक्कादायक ! सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; इलेक्ट्रिक हिटरने घेतला शॉक

सासरच्या मंडळींच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने इलेक्ट्रिक हिटर छातीस कवटाळून शॉक घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवत येथे घडली. 

    यवत : सासरच्या मंडळींच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने इलेक्ट्रिक हिटर छातीस कवटाळून शॉक घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवत येथे घडली. धनश्री अजित करडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

    याबाबतची फिर्याद धनश्री हिची आई कविता बापू ढेरे (रा. म्हमदवाडी  हडपसर) यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली. दिलेल्या या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी धनश्री हिस तिची सासू, नवरा, दिर आणि नणंद हे तुला स्वयंपाक येत नाही, असे म्हणत सतत सर्वांसमोर अपमान करीत. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी सतत शिवीगाळ, दमबाजी मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले.
    या सर्व जाचाला कंटाळून धनश्री हिने आत्महत्या केली. या फिर्यादीवरून धनश्रीची सासू शर्मिला राजाराम करडे, पती अजित राजाराम करडे, दीर सुजित राजाराम करडे, नणंद पूनम कैलास खैरे (रा. खामगाव फाटा) यांच्याविरोधात शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामराव घाडगे हे करीत आहेत.