घरातून दीड लाख चोरले अन् थेट गोवा गाठले आणि मग… १४ वर्षाच्या मुलाचा कारानामा ऐकून पोलिसही चाट पडले

हा १४ वर्षीय मुलगा गुजरातमधील वडोदरा येथील राहणारा आहे. अभ्यासावरुन पालकांचे सतत बोलणे ऐकवे लागते यामुळे मुलाना घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडल्यानंतर आपलं ड्रीम डेस्टीनेशन गाठायचं या विचाराने या मुलाने स्वत:च्याच घरात दीड लाखांची चोरी केली. विशेष म्हणजे या चोरलेल्या पैशांमधून थेट गोवा गाठलं आणि तेथील क्लबमध्ये जाऊन हे पैसे उडवले.

पुणे : अभ्यासावरुन पालक ओरडल्याने एका मुलाने घर सोडले. पण, घर सोडल्यानंतर त्याने केलेला कारानामा ऐकून पोलिसही चाट पडले . पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने या मुलाला ताब्यात घेतले.

हा १४ वर्षीय मुलगा गुजरातमधील वडोदरा येथील राहणारा आहे. अभ्यासावरुन पालकांचे सतत बोलणे ऐकवे लागते यामुळे मुलाना घर सोडण्याचा निर्णय घेतला. घर सोडल्यानंतर आपलं ड्रीम डेस्टीनेशन गाठायचं या विचाराने या मुलाने स्वत:च्याच घरात दीड लाखांची चोरी केली. विशेष म्हणजे या चोरलेल्या पैशांमधून थेट गोवा गाठलं आणि तेथील क्लबमध्ये जाऊन हे पैसे उडवले.

घर सोडल्यावर हा मुलगा थेट रेल्वे स्थानकावर पोहचला आणि गोव्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. मात्र आधारकार्ड नसल्याने त्याला खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर हा मुलगा अमितनगर सर्कलजवळ गेला आणि तेथून पुण्याला जाणारी बस पकडली. पुण्यामध्ये आल्यानंतर त्याने गोव्याला जाणारी बस पकडली.
दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्यामुळे चिंतेत असणाऱ्या पालकांनी पोलिसांकडे मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रार देऊन घरी आल्यानंतर घरातून दीड लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आलं याबाबतही त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

मुलानेच पैसे चोरल्याचा संशय पोलिसांना आला. याअनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिस त्याचा मोबाईल ट्रेस करत होते.  दरम्यान, पैसे संपत आल्याचं लक्षात येताच या मुलाने पुन्हा गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातमध्ये गेलं तरी घरी जायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. अखेर तो पुण्यात पोहचला. त्याने पुण्यात एक सीमकार्ड घेतलं. त्यानंतर त्याने एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून गुजरातचं तिकीट बूक केलं. तिकीट बूक केल्यानंतर त्याने मोबाईल सुरु केला. पोलिसांनी तात्काळ त्याचं लोकेशन ट्रेस करुन ट्रॅव्हल एजंटच्या ऑफिसमधून त्याला ताब्यात घेतलं.

पुणे पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी या मुलाला वडोदरा पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर या मुलाला शनिवारी त्याच्या घरी सोडण्यात आलं.