कोंढापुरीतील महिलेचा विनयभंग करणारा लातूरमधून अटक

कोंढापुरी (ता.शिरुर) येथील एका महिलेला फोन करुन फोनवर अश्लील भाषा वापरुन महिलेच्या मनास लज्जा निर्माण करुन महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतले. संदीप हरिबा घोलपे (वय २८, रा. कारेवाडी पोस्ट येरल ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

    शिक्रापूर : कोंढापुरी (ता.शिरुर) येथील एका महिलेला फोन करुन फोनवर अश्लील भाषा वापरुन महिलेच्या मनास लज्जा निर्माण करुन महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतले. संदीप हरिबा घोलपे (वय २८, रा. कारेवाडी पोस्ट येरल ता. शिरूर अनंतपाळ जि. लातूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

    कोंढापुरी (ता.शिरुर) येथील महिलेला तिच्या मोबाईलवर फोन करून महिलेशी अश्लील भाषेत चर्चा करुन ‘तुझे फोटो माझ्याकडे आलेले आहेत. ते मी व्हायरल करेल’, अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हे दाखल केले होते.

    दरम्यान, या गुन्ह्यातील युवक लातूर जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस हवालदार अजिनाथ शिंदे, पोलीस नाईक विकास पाटील, लखन शिरसकर यांनी लातूर गाठले. तेथे जात संदीप घोलपे याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने मोबाईलवर सदर कृत्य केल्याचे कबूल केले.