संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हर्षवर्धन हॉटेल येथे एक मोठा साप निघाला असल्याची माहिती वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र श्रीकांत भाडळे यांना मिळाली. त्यांनतरभाडळे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता तेथे घोणस जातीचा विषारी साप असल्याचे निदर्शनास आले.

    शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्राने पकडलेल्या विषारी घोणस जातीच्या सापाने सर्पमित्राच्या चक्क एकतीस पिल्लांना जन्म दिल्याची घटना घडली असून सर्व पिल्लांना व सापाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.

    शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हर्षवर्धन हॉटेल येथे एक मोठा साप निघाला असल्याची माहिती वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र श्रीकांत भाडळे यांना मिळाली. त्यांनतरभाडळे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता तेथे घोणस जातीचा विषारी साप असल्याचे निदर्शनास आले. यावेळी श्रीकांत भाडळे यांनी शिताफीने त्या सापाला विषारी सापाला पकडले आणि रात्रीच्या सुमारास घरी आणून ठेवले. नंतर सकाळच्या दरम्यान त्या सापाला निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी साप ठेवलेली बरणी घेतली असता सापाने काही पिल्लांना जन्म दिला असल्याचे दिसून आले. याबाबत शिरुर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर व वनरक्षक सोनल राठोड यांना माहिती देत सापाच्या सर्व पिल्लांना व सापाला वनविभागच्या हद्दीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले, यावेळी वनरक्षक सोनल राठोड, वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र श्रीकांत भाडळे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र बाळासाहेब मोरे, सर्पमित्र अमोल कुसाळकर, विनोद बाळासाहेब सासवडे हे उपस्थित होते.