
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या निवडणूक अर्जाची छाणनीचा कार्यक्रम आटोपून किरण गुजर हे इनोव्हा गाडीने बारामती कडे विद्या प्रतिष्ठान च बैठकीसाठी निघाले होते. सासवड पासून ८ कि. मी अंतरावरावर खळद परिसरात समोरून अचानक विद्यार्थी येत होते, या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दोन-तीन वाहने एकमेकावर आदळल्याने हा अपघात झाला.
बारामती : ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला असून या अपघातात किरण गुजर यांच्यासह चालक व एक सहकारी थोडक्यात बचावले आहेत. इनोव्हा गाडी मध्ये ते होते. एअर बॅग ओपन झाल्याने या अपघातातून किरण गुजर थोडक्यात बचावले .
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या निवडणूक अर्जाची छाणनीचा कार्यक्रम आटोपून किरण गुजर हे इनोव्हा गाडीने बारामती कडे विद्या प्रतिष्ठान च बैठकीसाठी निघाले होते. सासवड पासून ८ कि. मी अंतरावरावर खळद परिसरात समोरून अचानक विद्यार्थी येत होते, या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दोन-तीन वाहने एकमेकावर आदळल्याने हा अपघात झाला. या गाडीमध्ये गुजर यांच्यासोबत अमोल गावडे हेही होते. सुदैवाने एअर बॅग ओपन झाल्याने किरण गुजर यांच्यासह तिघेही बचावले. या अपघातात इनोव्हा गाडीचे नुकसान झाले आहे.