विजय उर्फ भज्जी नागेश तेलगू (वय २४, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई किशोर परदेशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी विजय तेलगू याला पिंपरी - चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांंसाठी तडीपार केले आहे.

    पिंपरी : तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात राजरोसपणे वावरणाऱ्या आरोपींला पोलीसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. २७) रात्री आंबेडकरनगर  देहूरोड येथे करण्यात आली.

    विजय उर्फ भज्जी नागेश तेलगू (वय २४, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई किशोर परदेशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी विजय तेलगू याला पिंपरी – चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांंसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून त्याला जेरबंद केले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळून आला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.