मास्क सक्तीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ५८६ लोकांवर कार्रवाई

पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे

    पिंपरी: कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारंवार आवाहन करूनही नागरिक प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करतात. पिंपरी चिंचवड़ शहरात विनामास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ५८६ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. पिंपरी चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. तरीदेखील नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

    पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

    एमआयडीसी भोसरी (२७), भोसरी (२३), पिंपरी (२०), चिंचवड (५७), निगडी (३८), आळंदी (४१), चाकण (१२), दिघी (२९), सांगवी (४२), वाकड (६६), हिंजवडी (८२), देहूरोड (२७), तळेगाव दाभाडे (००), तळेगाव एमआयडीसी (००), चिखली (६६), रावेत चौकी (००), शिरगाव चौकी (१५), म्हाळुंगे चौकी (४१)