
अविनाश भोसले व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू होती.
पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) त्यांची पुण्यातील कार्यालये व घरावर छापे टाकत त्यांचे पुत्र अमित भोसले यांना फेब्रुवारी महिन्यात पुण्यातून ताब्यात घेऊन मुंबईत आणले होते. बिलार्ड पिअर येथील कार्यालयात त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. आज ईडीने परकीय चलन नियमन कायद (फेमा) १९९९ अंतर्गत भोसले यांची पुणे आणि नागपूरमधील ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.
— ED (@dir_ed) June 21, 2021
अमित भोसले हे महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे आहेत. अविनाश भोसले व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू होती.
ईडीने १० फेब्रुवारी रोजी बजावलेले समन्स व परकीय चलन नियमन कायद (फेमा) अंतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.