कपड्याच्या दुकानातच सुरू असणाऱ्या क्रिकेट बेटींगवर छापा; पावणे तीन लाखांची रोकड आणि इतर ऐवज जप्त

आतापर्यंत शहरात झालेल्या कारवाया या बंद फ्लॅट तसेच लॉजवर छापेमारीकरून करण्यात आल्या आहेत. परंतु, दुकानातून बेटींग सुरू असतानाची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जाते. ही कारवाई अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, युनिट दोनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक श्रीधर खडके पथकातील आण्णा माने, निखील जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.

    पुणे : खडकीतील कपड्याच्या दुकानातच सुरू असणाऱ्या क्रिकेट बेटींगवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी केली आहे. एकाला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल पावणे तीन लाखांची रोकड आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुनित चंदनमल जैन (वय ३६, रा. के. जे. रोड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    देशभरात कुठेही भारत संघ आणि इतर देशाशी क्रिकेट मॅचेस असल्यानंतर शहरात या क्रिकेटवर सट्टा घेतला जात असल्याचे आतापर्यंत करण्यात आलेल्या पोलीसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यात ठरावीक लोकांचा सहभाग असल्याचेही दिसत आहे. मोबाईलद्वारे ऑनलाईनच्या माध्यमातून हे बेटींग सुरू असते. रविवारी भारत विरूद्ध साऊथ अफ्रिका या दोन संघात क्रिकेट मॅच होती.

    या मॅचवर खडकी येथील चंदन हॅन्डल्युम्स या कपड्याच्या दुकानात बेकायदेशीररित्या बेटींग सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने व गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पुनीत हा मोबाईलवर क्रिकेट बेटींग घेत असल्याचे दिसून आले. त्यानुसार, त्याला ताब्यात घेऊन झडती घेतल्यानंतर त्याठिकाणी पोलीसांना २ लाख ६८ हजार रुपयांची रोकड, दोन मोबाईल असा एकूण पावणे तीन लाखांचा ऐवज जप्त का आहे.