अय्याश खानासाठी मंत्र्यांकडे वेळ, गरीब कामगारांसाठी नाही; ऍड. रवींद्र गारुडकरांचे सरकारवर टीकास्त्र

समुद्रात अय्याशी करणाऱ्या आर्यन खानकडे लक्ष द्यायला या सरकाकडे वेळ आहे. मात्र, आपल्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन करण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे दुःख, वेदना समजून घ्यायला त्यांना वेळ मिळत नाही, हे दुर्दैव आहे.

    तळेगाव दाभाडे : समुद्रात अय्याशी करणाऱ्या आर्यन खानकडे लक्ष द्यायला या सरकाकडे वेळ आहे. मात्र, आपल्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन करण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे दुःख, वेदना समजून घ्यायला त्यांना वेळ मिळत नाही, हे दुर्दैव आहे. राज्याला अकार्यक्षम परिवहनमंत्री लाभल्याने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, अशा शब्दांत मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र गारुडकर यांनी परिवहनमंत्री ऍड. अनिल परब (Anil Parab) यांच्यावर हल्ला चढविला.

    एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी तळेगाव दाभाडे एसटी आगारासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (दि. १२) मावळ तालुका मनसेने पाठिंबा दिला. तसेच आंदोलनात सक्रिय सहभागही घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

    मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड. रवींद्र गारुडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सचिन भांडवलकर, रामदास येवले, संजय शिंदे, मोजेस दास, अशोक कुटे, भरत बोडके, राहुल मांजरेकर, निरंजन चव्हाण, जॉर्ज दास, संदीप पोटफोडे, विजय भानुसघरे, नाथा पिंपळे, योगेश हुलावळे, सुनील सालवे, अमित बोरकर, सुमित उके, संदीप शिंदे आदींनी सहभाग घेतला.