पुण्यानंतर मुंबईतही अ‍ॅमेझॉनच्या वेअर हाऊसचे  मनसैनिकांकडून  ‘खळखट्याक’

 मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‍ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‍ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मालाचे वितरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे.

मुंबई: मनसैनिकांनी औरंगाबाद आणि पुण्यात कोंढवा येथे सकाळी अमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर दुपारनंतर त्यांनी मुंबईत देखील एका गोदामाची तोडफोड केली आहे. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या अ‍ॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी लक्ष्य केले.
अ‍ॅमेझॉन कंपनीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी भाषा सक्तीच्या मुद्यावर न्यायालयात खेचल्यानंतर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या या अ‍ॅमेझॉनच्या गोदामाला खळखट्याक केले. चांदीवलीतील साकीविहार येथील मारवे रोडवर असलेल्या अमेझॉनच्या कार्यालयात जाऊन चांदीवली मतदार संघातील मनसैनिकांनी तोडफोड केली आहे. त्यापूर्वी औरंगाबाद आणि पुण्याच्या कोंढवा येथील अमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर आता हे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद आणखीनच चिघळला आहे. मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‍ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‍ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मालाचे वितरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे. त्यापूर्वी अ‍ॅमेझॉनविरोधात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर पाहायला मिळाले होते.
“अ‍ॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एखाद्या मूर्ख वकिलाकडून जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागेल, असा इशारा मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला