Ajit Pawar's criticism of Devendra Fadnavis and Chandrakant Patil

एक जण म्हणतो पुन्हा येईन...दुसरा म्हणतो परत जाईन...एकाला पुन्हा येणं काही जमलं नाही. आता हे म्हणताहेत पुन्हा जाईन. अरे, तुम्हाला पुण्यात बोलावलं कुणी होतं?", असं म्हणत अजित पवार यांनी भाजपच्या या दोन नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

पुणे : एका दगडात दोन पक्षी मारणे म्हणजे काय असते याची प्रचिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीने दिली आहे. आपल्या आक्रमक अंदाजात त्यांनी भाजपच्या दोन नेत्यांवर एकाच वेळी निशाणा साधला आहे. विरोधे पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांनी टीका केली आहे.

कुठेही काही घटना घडली की त्याचं नातं पुण्याशी जोडलं जातं. पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचं शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिजे पण देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाईन असे वक्तव्य शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा अजित पवारांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

एक जण म्हणतो पुन्हा येईन…दुसरा म्हणतो परत जाईन…एकाला पुन्हा येणं काही जमलं नाही. आता हे म्हणताहेत पुन्हा जाईन. अरे, तुम्हाला पुण्यात बोलावलं कुणी होतं?”, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपच्या या दोन नेत्यांवर टीकेची झोड उठवली.

यावेळी शेतकरी आंदोलनावरुन अजित पवारांनी फडणवीसांना चांगलच सुनावलं. बैलगाडीत बसून फोटो काढण्यापेक्षा शेतकऱ्यांशी बोलावं असा टोला अजित पवार यांनी लगावला. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन देखील केलं.