देशमुखांच्या चौकशीवरही विश्वास ठेवा; पुणे महापौरांचा सुप्रिया सुळेंना टोला

सुप्रियाताईंनी अशी मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचे स्वागत करतो. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ईडी चौकशीबाबतीतही त्यांनी हाच विश्वास कायम ठेवावा, असा टोला मोहोळ यांनी लगावला आहे. कचरा प्रश्नावरून भाजपवर टीका करणाऱ्या सुळे यांना कात्रीत पकडत मोहोळ यांनी वेगळाच सवाल केला आहे.

    पुणे : पुणे शहरातील कचरा प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कचऱ्याबाबत झालेल्या खर्चाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळेंच्या या मागणीवर शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत. पुणे महापालिका निवडणुका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ईडीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

    सुप्रियाताईंनी अशी मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचे स्वागत करतो. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ईडी चौकशीबाबतीतही त्यांनी हाच विश्वास कायम ठेवावा, असा टोला मोहोळ यांनी लगावला आहे. कचरा प्रश्नावरून भाजपवर टीका करणाऱ्या सुळे यांना कात्रीत पकडत मोहोळ यांनी वेगळाच सवाल केला आहे.

    सुप्रियाताई यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. 2014 पर्यंत आणि 2019 नंतर अजित पवार यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेले नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का?, असा सवालही मोहोळ यांनी उस्थित केला आहे.