बारामतीच्या अल्ताफ शेख यांची यूपीएससीत बाजी

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती तालुक्यातील काटेवाडीतील अल्ताफ महंमद शेख (Altaf Sheikh) यांनी देखील यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) बाजी मारली आहे. यूपीएससी परीक्षेत त्यांनी ५४५ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदासाठी पात्र झाले आहेत.

    यापूर्वी अल्ताफ यांनी २०१५ साली युपीएसची परीक्षा पास होऊन केंद्रीय गृह खात्यात डीवायएसपी पदावर रुजू झाले होते. सुरवातीला उत्तर प्रदेशमधील सितापूर जिल्ह्यात कार्यरत होते. त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये त्यांची बदली उस्मानाबाद इथं झाली होती.

    वयाच्या २२ व्या वर्षी अल्ताब हे पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा पास झाले. त्यानंतर नोकरी करत आता पुन्हा एकदा आयपीएस पदासाठी त्यांची निवड झाली. शेख हे एका सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.