सिग्नल तोडल्याने थांबवल्याचा आला राग; संतप्त दुचाकीचालकाने घेतला पोलिसाचा चावा

पुणे, हडपसर पोलीस चौकीत तक्रार देण्यास आलेल्यांना समजावून सांगितल्याच्या रागातून एकाने कर्मचाऱ्यास धमकावत गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे.

    पुणे : सिग्नल तोडणाऱ्या (Signal Break) दुचाकीस्वाराला थांबविल्यानंतर त्याने वाद घालत पोलिसाच्या हाताला चावा घेऊन तसेच दगडाने मारून जखमी केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी परमेश्वर पाडळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगेश शमाकांत काळे (वय २९) याला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एरंडवणा येथील काळभैरव महादेव मंदिराशेजारी मंत्री उद्यानासमोर वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते. यावेळी मंगेश याने सिग्नल तोडून पुढे गेला. त्यामुळे त्याला थांबण्याचा इशारा केला. याचा राग आल्याने त्यांच्याशी आरेरावीची भाषा करत वाद घातला. दगड डोळ्यावर मारून जखमी केले. तसेच त्यांच्या हाताला चावा घेतला. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

    सरकारी कामात अडथळा

    पुणे, हडपसर पोलीस चौकीत तक्रार देण्यास आलेल्यांना समजावून सांगितल्याच्या रागातून एकाने कर्मचाऱ्यास धमकावत गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सचिन उद्धव सुर्यवंशी (वय २६, रा. निगडेनगर) याला अटक केली आहे. तर एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोमनाथ बनसोडे यांनी तक्रार दिली आहे.