..अन संयम सुटला ; दारू दुकानावर हल्लाबोल;तरुण आक्रमक !

वारंवार पोलीस स्टेशनला तक्रारी देऊन कारवाई केली जात नव्हती,या दारुमुळे गावातील तरुण वर्ग देशोधडीला लागला आहे.अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे.यापुढे ही कुणी अवैधरित्या दारू विकन्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व गावातील तरुण एकत्र येउन अशाच पद्धतीने हल्ल्बोल करू व दारूचा कायमस्वरूपी विनाश करू अशी माहिती यावेळी अमोल चौगुले यानी दिली आहे.

    पारगाव : मांडवगण फराटा ता.शिरूर येथे अवैधरित्या चालणार्या दारू विक्री करणारे हॉटेलवर गावातील तरुणानी आज(ता.२३) रोजी हल्लाबोल केला.लॉकडाउन च्या काळात हॉटेल व्यवसाय डबघाईला आले होते.कमी वेळेत बेकायदेशीर व्यवसाय करुन मोठे होण्याच्या नादात अनेकांचे संसार या व्यवसायिकानी उध्वस्त केले आहे.

    गावातील अनेक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करुन देखील या दारूविक्रेत्यावर कारवाई का? होत नाहीये असा सवाल यावेळी उपस्थित केला आहे.मांडवगण फराटा ग्रामपंचायत च्या वतीने दहा वर्षापूर्वी ‘उभी बाटली आडवी बाटली’ या संदर्भात महिलांचे मतदान घेउन दारुबंदी ठराव संमत करण्यात आला होता.यामध्ये आडवी बाटली विजयी होउन कायमस्वरूपी दारू बंदी अशी आशा निर्माण झाली होती परंतु त्यावर विरजन पडले व पुन्हा त्याच जोमाने दारू विक्री चालू झाली.पोलिसाकडून होणारी कारवाई ची झलक ही फक्त कागदोपत्रीच उरली का? असे म्हणायला वावगे ठरणार नाही.

    तसेच गावातील तरुणानी एकत्रित येत अवैधरित्या दारू विक्री चालू असणार्या अन्नपूर्णा,राजमुद्रा,जल्लोष या हॉटेलवर हल्लाबोल करत रस्त्यावर दारुच्या बाटल्या फोडून नाश केला आहे.सदर घटनेची माहिती घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जगदाळे याना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.या हॉटेल चालकावर आता कारवाई होणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

    ..अन संयम सुटला