“अनिकेत विश्वासराव हाजीर हो…” ; पोलिसांकडून नोटीस, पत्नीच्या छळप्रकरणी कुटुंबीयांवर गुन्हा

निकेत हा मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याची पत्नी स्नेहा देखील अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पत्नीचे नाव आपल्यापेक्षा मोठे होईल या भीतीने तिला वारंवार मारहाण करण्यात आल्याची आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार स्नेहा यांनी दिली होती.

    पुणे : पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याला पुणे पोलीसांनी नोटीस पाठविली आहे. त्याला सोमवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत ही नोटीस बजावली आहे.पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अभिनेता अनिकेत विश्वासराव व त्याच्या कुटूंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी पत्नी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय २९) यांनी तक्रार दिली आहे.अनिकेत हा मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याची पत्नी स्नेहा देखील अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पत्नीचे नाव आपल्यापेक्षा मोठे होईल या भीतीने तिला वारंवार मारहाण करण्यात आल्याची आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार स्नेहा यांनी दिली होती. अनिकेतने अनैतिक संबंध लपवून ठेवले होते. तसेच वारंवार ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्याला नोटीस बजावत सोमवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास नोटिशीद्वारे कळविण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी सांगितले आहे.