साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी सुभाषराव जाधव व ज्ञानेश नवले यांची नियुक्ती

वडगाव मावळ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी वडगाव येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सुभाषराव जाधव तसेच ज्ञानेश नवले यांची मंगळवार (दि २९) रोजी निवड करण्यात आली. हि निवड झाल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

वडगाव मावळ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी वडगाव येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सुभाषराव जाधव तसेच ज्ञानेश नवले यांची मंगळवार (दि २९) रोजी निवड करण्यात आली.
हि निवड झाल्याने परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले तसेच उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जाधव व नवले यांचा सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आले

सुभाषराव जाधव हे वडगाव मावळ येथील असून राष्ट्रवादीचे मावळ तालुका ग्रामीण ब्लॉकचे अध्यक्ष तसेच पोटोबा देवस्थानचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. तर ज्ञानेश नवले यांनी यापूर्वीही कारखान्याचे तज्ञ संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, बाळासाहेब विनोदे, चेतन भुजबळ, दिलीप दगडे, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, मधुकर भोंडवे, सुभाष राक्षे, दिनेश मोहिते, प्रवीण काळजे, नरेंद्र ठाकर, ताराबाई सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.दुर्वे, कार्यकारी संचालक एस.जी.पठारे उपस्थित होते.