delhi police rescues 15 year old girl after 35 day long operation

शहरात जबरीच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, अहमदरज्जा याच्यावर तीन जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दोन साथीदारांना यापुर्वीच पोलीसांनी अटक केली होती. परंतु, अहमदरज्जा हा पोलीसांना गुंगारा देत होता. तो गेल्या सात महिन्यांपासून फरार होता.

    पुणे : जबरी चोरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये गेल्या सात महिन्यांपासून फरार असणाऱ्या आरोपीला कोंढवा पोलीसांनी सापळा रचून अटक केली. तो वेशभूषा बदलून राहत होता. अहमदरज्जा वसि अहमद शेख (वय २४, रा. कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    शहरात जबरीच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, अहमदरज्जा याच्यावर तीन जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दोन साथीदारांना यापुर्वीच पोलीसांनी अटक केली होती. परंतु, अहमदरज्जा हा पोलीसांना गुंगारा देत होता. तो गेल्या सात महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध घेतला जात होता. मात्र, तो सापडत नव्हता. कोंढवा पोलीसांकडून त्याचा शोध घेतला जात असताना तो परिसरात आला असल्याची माहिती अंमलदार दिपक जडे व महेश राठोड यांना मिळाली. त्याने दाढी वाढविलेली असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी सुरू असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अनिल सुरवसे हे करत आहेत.