प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शहरात नव्याने उदयास आलेल्या भाईंकडून पिस्तूलांचा वापर अधिक होत असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला माहिती मिळाली की, जतीन पवार हा इंदीरानगर भागात फिरत असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे. या माहितीची खातरजमा केली.

    पुणे : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. जतीन संतोष पवार (वय १९, रा. धायरीगांव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरात नव्याने उदयास आलेल्या भाईंकडून पिस्तूलांचा वापर अधिक होत असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला माहिती मिळाली की, जतीन पवार हा इंदीरानगर भागात फिरत असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे. या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे व उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. ते जप्त केले आहे. दरम्यान, त्याने हे पिस्तूल कोणाकडून आणले व त्याचा वापर कोठे करणार होता, याबाबत तपास केला जात आहे.

    जतीन पवार हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोडा, खूनाचा प्रयत्न, मारमारी असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टेम्पो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ट निरीक्षक शैलेश संखे, उपनिरीक्षक संजय गायकवाड, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, अमोल पवार, अजय थोरात, महेश बामगुडे व त्यांच्या पथकाने केली.