डॉ. रजनी इंदुलकर
डॉ. रजनी इंदुलकर

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. रजनी इंदुलकर यांची फेर निवड करण्यात आली आहे. 1982 साली स्थापन झालेल्या क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही संस्था देशभरात गुणवत्ता मंडळाचा प्रसार करण्यासाठी आघाडीवर असून आज देशभरात 35 शाखांमधून उद्योग समूहातील व्यवस्थापन व इतर सर्वस्तरावरील घटकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण तज्ज्ञांकरवी दिले जाते.

पिंपरी (Pimpari). क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. रजनी इंदुलकर यांची फेर निवड करण्यात आली आहे. 1982 साली स्थापन झालेल्या क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया ही संस्था देशभरात गुणवत्ता मंडळाचा प्रसार करण्यासाठी आघाडीवर असून आज देशभरात 35 शाखांमधून उद्योग समूहातील व्यवस्थापन व इतर सर्वस्तरावरील घटकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण तज्ज्ञांकरवी दिले जाते.

भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेेंटरमध्ये फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष व परिषद सदस्य सतीश काळोखे यांच्या उपस्थितीत क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे शाखेच्या सन 2021 ते 2023 कालावधीसाठी 12 परिषद सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. त्यात डॉ. रजनी इंदुलकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. इंदुलकर यांनी सचिवपदी डॉ. अजय फुलंबरकर व कोषाध्यक्षपदी संजीव शिंदे यांची निवड केली.

पुणे शाखेच्या परीषद सदस्यपदी रावसाहेब सुर्यवंशी, प्रकाश यार्दी, माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर, सुरेंद्र वायकर, अरुण आडीवरेकर, कु. परवीन तरफदार आणि भूपेश माल यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित परिषदेच्या सदस्यांची यावेळी चंद्रहास रानडे, धनंजय वाघोलीकर यांची परिषदेचे स्वीकृत सदस्यपदी निवडले. निवडणूक अधिकारी म्हणून चंद्रशेखर रुमाले यांनी काम पाहिले.