पुण्यात ७ कोटींना २२३ स्क्रॅप बसेसचा लिलाव ; सुमारे ६ काेटी ८८ लाख रुपये मिळाले

पीएमपीने नुकतेच २२३ स्क्रॅप बसेसचा लिलाव नुुकताच केला. या लिलावात पीएमपीला ६ काेटी ८८ लाख ३२ हजार रुपये इतकी रक्कम मिळाली. दोन्ही लिलावाची तुलना करता डिसेंबर महीन्यात झालेल्या लिलावात सरासरी प्रती बस २ लाख ३ हजार रुपये रक्कम मिळाली हाेती. तर नुकतेच झालेल्या लिलावात सरासरी प्रति बस मागे ३ लाख ८ हजार रुपये रक्कम प्राप्त झाले. लिलाव प्रक्रीयेत बदल केल्यानेच ही रक्कम जादा मिळाल्याचे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे.

    पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या ( पीएमपीएल) २२३ स्क्रॅप बसेस विक्रीच्या लिलावातून सुमारे ६ काेटी ८८ लाख रुपये मिळाले आहे. विक्रीच्या प्रक्रीयेत बदल केल्याने अधिक रक्कम मिळण्यास मदत झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पीएमपीएलने यापूर्वी स्क्रॅप बसेस व स्क्रॅप मटेरियलची डिसेंबर २०२० मध्ये ऑनलाईन विक्री केली हाेती. तेव्हा झालेल्या लिलावमध्ये पीएमपीच्या स्क्रॅप झालेल्या १९७ बसेस २ टेम्पो विक्रिसाठी ठेवण्यात आल्या हाेत्या. या बसेस आणि टेम्पाेच्या विक्रीतून पीएमपीला ४ काेटी ४ लाख ४८ हजार रुपये रक्कम मिळाली हाेती. त्याच धर्तीवर पीएमपीने नुकतेच २२३ स्क्रॅप बसेसचा लिलाव नुुकताच केला. या लिलावात पीएमपीला ६ काेटी ८८ लाख ३२ हजार रुपये इतकी रक्कम मिळाली. दोन्ही लिलावाची तुलना करता डिसेंबर महीन्यात झालेल्या लिलावात सरासरी प्रती बस २ लाख ३ हजार रुपये रक्कम मिळाली हाेती. तर नुकतेच झालेल्या लिलावात सरासरी प्रति बस मागे ३ लाख ८ हजार रुपये रक्कम प्राप्त झाले. लिलाव प्रक्रीयेत बदल केल्यानेच ही रक्कम जादा मिळाल्याचे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे.