ओबीसी शिबिरातील गर्दी टाळा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवारांना गंभीर सल्ला

इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) पुण्यात होणाऱ्या शिबिराला 250 ते 300 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसारच या शिबिराला कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येईल. त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल सरकारमधील मंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावी, असा सल्लादेखील त्यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता दिला.

    पुणे : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) पुण्यात होणाऱ्या शिबिराला 250 ते 300 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसारच या शिबिराला कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येईल. त्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जाहीर कार्यक्रमांमधील संख्येची दखल सरकारमधील मंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावी, असा सल्लादेखील त्यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता दिला.

    नियमानुसार उपस्थितीही बंधनकारक

    स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात शिबिर आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे ग्रामीण भागातील संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. तरी देखील कोणी शिबिर घेत असल्यास हरकत नाही. मात्र, प्रशासनाकडून नियमानुसार जेवढी उपस्थिती ठेवण्याबाबत सांगितले जाईल, तेवढ्याच कार्यकर्त्यांना या शिबिरासाठी उपस्थित राहता येईल.

    परवानगी दिलेल्या संख्येपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना उपस्थित राहता येणार नाही. याबाबत वडेट्टीवार यांच्याशी मी स्वत: बोलणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

    हे सुद्धा वाचा