कोरेगाव भीमा परीसरात तीन दिवस येण्यास बंदी – डॉ. अभिनव देशमुख

या वर्षीचा सदर कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले असून या परिपत्रकानुसार कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कोणतीही व्यक्ती येणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे असे सांगण्यात आले असताना जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ देखील लागू केले आहे, त्यानुसार ३० डिसेंबर २०२० पासून २ जानेवारी २०२१ सकाळी पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे.

शिक्रापूर: कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी अभिवादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असताना या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे शासनाने सर्वच कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरे केले असल्याने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम देखील प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून बाहेरील नागरिकांना कोरगाव भीमा व परिसरातील सोळा गावांमध्ये येण्यास ३० डिसेंबर पासून बंदी घालण्यात आली असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.

विजयस्तंभ अभिवादन साठी प्रत्येक वर्षी लाखो अनुयायी येत असतात, मात्र या वर्षीचा सदर कार्यक्रम प्रतिकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले असून या परिपत्रकानुसार कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कोणतीही व्यक्ती येणार नाही यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे असे सांगण्यात आले असताना जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ देखील लागू केले आहे, त्यानुसार ३० डिसेंबर २०२० पासून २ जानेवारी २०२१ सकाळी पर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानुसार कोणतीही व्यक्ती अथवा वाहने कार्यक्रमासाठी येणार नाही याची दक्षता प्रशासनाच्या वतीने आम्ही घेत आहे, तसेच प्रतिकात्मक स्वरुपात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जे मोजके व्यक्ती उपस्थित राहणार आहेत त्यांना पोलीस प्रशासनाच्या पास देण्यात येणार असून ते पास लोणीकंद पोलीस स्टेशन, शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच पोलीस मुख्यालय येथून देण्यात येणार आहेत. त्यानुसार पास असणाऱ्या मोजक्या व्यक्ती वगळता इतर कोणतीही व्यक्ती या परिसरात येणार नाही यासाठी दक्षता घेतली जात असून, पेरणे येथे होणारा अभिवादन कार्यक्रम सर्व अनुयायांसह नागरिकांना आपापल्या घरात बसून पाहता यावा यासाठी दूरदर्शन आणि इतर प्रसार माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

त्यामुळे सर्व अनुयायांनी सदर कार्यक्रम घरात बसून पहावा असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करत असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. तसेच सोशल मीडियावर चुकीची माहिती अथवा अफवा पसरविनाऱ्यावर प्रतिबंध करण्यात आला असून परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, सभा यांसह परिसरात होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे देखील यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. तर कामाला जाणाऱ्या व्यक्तींना कामावर जाता येणार असून त्यांनी ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे, तसेच विजयस्तंभ परिसरातील सोळा गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून तेथील स्थानिक व्यवहार सुरु ठेवण्यात येणार असून स्थानिकांनी पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या गावांमध्ये प्रवेशास बंदी

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, वाजेवाडी, पिंपळे जगताप, आपटी, वाडेगाव तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील लोणीकंद, पेरणे, तुळापुर, बकोरी, वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव या गावांमध्ये येण्यास नागरिकांना ३० डिसेंबर २०२० पासून २ जानेवारी २०२१ च्या सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे.