महिलेची छेड काढणाऱ्या होम रक्षकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे बारामती न्यायालयाचे आदेश

सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजय लोंढे व राजू अनिल लोंढे या दोघां होमगार्ड रक्षकांनी सहकारी सदर विवाहिता व तिच्या मुलीची छेड काढली व लज्जा स्पद वर्तन वर्तन केले. त्यानंतर त्यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली याबाबत भिगवण पोलिस स्टेशनला तक्रार देण्या बाबत सदर महिला भिगवन पोलीस स्टेशनला गेली मात्र त्याठिकाणी फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही म्हणून फिर्यादीने पोलीस अधीक्षक पुणे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने बारामती सत्र न्यायालयात न्याय मिळावा यासाठी फौजदारी खटला दाखल केला.

    बावडा: विवाहिता व तिची अल्पवयीन मुलगी यांचे बरोबर अश्लील चाळे काढून छेड काढल्याप्रकरणी दोन होमगार्ड रक्षक आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करावेत तसेच भिगवन चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पोलीस हवालदार भागवत यांची प्रशासकीय चौकशी करून कारवाई करावी असे आदेश बारामती येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी दिले.त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

    या प्रकरणाची हकीकत अशी की, सदर विवाहिता ही आपल्या कुटुंबासह तक्रारवाडी (भिगवन) येथे राहते. दि.१७ ऑक्ट २१ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजय लोंढे व राजू अनिल लोंढे या दोघां होमगार्ड रक्षकांनी सहकारी सदर विवाहिता व तिच्या मुलीची छेड काढली व लज्जा स्पद वर्तन वर्तन केले. त्यानंतर त्यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली याबाबत भिगवण पोलिस स्टेशनला तक्रार देण्या बाबत सदर महिला भिगवन पोलीस स्टेशनला गेली मात्र त्याठिकाणी फिर्याद नोंदवून घेण्यात आली नाही म्हणून फिर्यादीने पोलीस अधीक्षक पुणे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने बारामती सत्र न्यायालयात न्याय मिळावा यासाठी फौजदारी खटला दाखल केला. सदर फिर्यादीची दखल घेऊन न्यायालयाने संबंधित आरोपी विरुद्ध दखलपात्र गुन्हा केल्याचे स्पष्ट करून सदर आरोपी विरुद्ध घरात घुसून मारहाण, दमदाटी, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा व पोलीस निरीक्षक, पोलीस हवलदार यांची वरिष्ठ मार्फत खाते अंतर्गत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. सदर खटल्यात फिर्यादीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कमलकांत तोरणे यांनी काम पाहिले.