
संजय राऊतांनी पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. बारामतीही आपली आहे. तिकडेही लोक आहेत. पुरंदर जिंकले की बारामतीही आपण जिंकू शकतो. भले बारामतीत आपल्या जागा निवडून येणार नाहीत. पण आपली ताकद तर वाढेल. त्यामुळे आपण आपली ताकद वाढवू शकतो ही सकारात्मकता राहिली पाहिजे, असं संजय राऊतांनी म्हटलं.
पुणे : शिवसेना नेते संजय राऊत रविवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्याच्या वडगाव शेरीत त्यांचं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली.
दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. बारामतीही आपली आहे. तिकडेही लोक आहेत. पुरंदर जिंकले की बारामतीही आपण जिंकू शकतो. भले बारामतीत आपल्या जागा निवडून येणार नाहीत. पण आपली ताकद तर वाढेल. त्यामुळे आपण आपली ताकद वाढवू शकतो ही सकारात्मकता राहिली पाहिजे, असं संजय राऊतांनी म्हटलं.
बारामती पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण हाच बालेकिल्ला जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, बारामती जिंकण्याचा संकल्प सोडत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.