पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण; तीन फुकट्या ग्राहकांवर गुन्हा दाखल

आरोपींना खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे मागितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण तसेच शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या हातगाडीच्या गल्यातील १ हजार १०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी: खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे पाणीपुरी विक्रेत्याने मागितले. त्यावरून तिघांनी मिळून पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना कासारवाडी रेल्वे गेटच्या जवळ घडला आहे. याबाबत तीन फुकट्या ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर पवार, विशाल खंदारे आणि त्यांचा अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत करण शामलाल अहिर (वय १९, रा. कासारवाडी. मूळ रा. राजस्थान) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण हे पाणीपुरी विकण्याचे काम करतात. कासारवाडी रेल्वे गेटच्या जवळ पाणीपुरी विक्रीचे काम करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडून पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना खाल्लेल्या पाणीपुरीचे पैसे मागितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण तसेच शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या हातगाडीच्या गल्यातील १ हजार १०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.