आयपीएलच्या सामन्यावर पुण्यात सट्टा ; दोन बुकींसह ‘इतक्या’ लाखांची रक्कम पोलिसांनी केले जप्त

बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात ५०० आणि २००० च्या नोटा आढळून आल्या आहे. तसंच, अकाऊंटमध्येही लाखो रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन जप्त केले आहे.

    पुणे: दुबईमध्ये आयपीएलचे (IPL 2021) सामने सुरु आहेत. या सामन्यांवर पुण्यात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन बड्या बुकींना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून तब्बल ९२ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ऐवज जप्त केला आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टाकिंग गणेश भुतडा व अशोक देहूरोडकर अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी मार्केटयार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

    या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी पथकं तयार केली होती. T20 वर्ल्ड कप जिंकण्याची रणनीती ‘या’ हॉटेलमध्ये ठरणार, धोनीशी आहे खास कनेक्शन दोन वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी नाना पेठ आणि मार्केटयार्डमध्ये छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली. दोन्ही ठिकाणावर 92 लाख रुपये रोख आणि ६५ हजार रुपयांचा ऐवज मिळाला आहे.

    बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात ५०० आणि २००० च्या नोटा आढळून आल्या आहे. तसंच, अकाऊंटमध्येही लाखो रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन जप्त केले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अनेकांची धागे हाती लागले आहेत. त्यामुळे या बुकिंबाबत अजून तपास पोलीस करत आहेत.