सावधान पुणेकरांनो! गणपती पाहायला बाहेर पडू नका नाहीतर ‘ही’ शिक्षा भोगावी लागणार

रात्री गणपती पाहण्यास मध्यवस्तीत आलेल्या तरुणांना पोलिसांनी उठबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे. हे तरुण ग्रामदैवत कसबा गणपती समोर आल्यानंतर त्यांना पोलिसांनी ही शिक्षा दिली आहे. दरम्यान पुणेकरांनी विनाकारण रात्री बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.

    पुणे : पुण्यात गणपती पाहायला बाहेर पडत आहे तर सावधान पुणेकरांनो! कारण, अश्याच रात्री फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठबश्या काढण्याची शिक्षा दिली आहे. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

    पुण्यात वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्री १० नंतर शहरात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडण्यास बंदी आहे. तरीही काहीजण गणपती पाहण्यासाठी म्हणून बाहेर पडत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्याचा पहिला भाग पाहिला मिळाला आहे.