भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; ओबीसी परिषदेत अनेक महत्वाचे राजकीय ठराव

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर येथील जिल्हापरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच आता ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अश्या सर्वपक्षीय नेत्यानी या ठिकाणी हजेरी लावत आपले विचार मांडले. यावेळी ओबीसी परिषदेत काही राजकीय ठराव मांडण्यात आले.

    लोणावळा : ओबीसी राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर ओबीसी नेते एकत्र येण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली जात असल्याचा दावा ओबीसी चिंतन शिबीराच्या आयोजकांनी केला आहे. ‘जो ओबीसी का बात करेगा वही देश पे राज करेगा’ अशा घोषणा देत सकाळीच ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला सुरुवात केली. राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर लोणावळ्यात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या शिबिरात दुस-या दिवशी अनेक ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

    सर्वपक्षीय नेत्यांची शिबीरात हजेरी

    महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर येथील जिल्हापरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच आता ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अश्या सर्वपक्षीय नेत्यानी या ठिकाणी हजेरी लावत आपले विचार मांडले. यावेळी ओबीसी परिषदेत काही राजकीय ठराव मांडण्यात आले.

    तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू

    दरम्यान, राज्यात सभा, प्रचार करण्यास बंदी आहे. शाळा, कॉलेज बंद आहेत. अशा परिस्थितीत निवडणुका कशा काय घेता असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे. जर अशा काळात निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये नागरिकांचे मृत्यू झाले तर सरकारविरोधात आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.