ajit pawar

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी परत राष्ट्रवादीत येण्याचे ठरविल्याचे सांगितले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील कोणते पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार याची जोरदार चर्चा सुरु झाली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी परत राष्ट्रवादीत येण्याचे ठरविल्याचे सांगितले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील कोणते पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार याची जोरदार चर्चा सुरु झाली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पुण्यातील एका कार्यक्रमानंतर राजकीय समीकरणे बदलण्याबाबत गौप्यस्फोट केला. अनेकजण आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले भाजप मध्ये जाणा-यांना राष्ट्रवादीचे सरकार येणार नाही. भाजपचेच सरकार येईल, असे वाटत होते. त्यामुळे ते कामाकरता भाजपमध्ये गेले होते. जे कामा करता गेले असतील त्यांची तिथे कामे झाली नाहीत तर ते कामाकरता परत दुसरीकडे जातील. इतर पक्षातील आमदार घेताना भाजपला उकळ्या फुटत होत्या, बरे वाटत होते. आता गार-गार वाटते, असा टोलाही पवार यांनी लगाविला. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील देखील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अजित पवार यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजपमधील कोणते पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार याची जोरदार चर्चा सुरु झाली असताना पिंपरी चिंचवड़ मधील भाजप चे काही नाराज नगरसेवकांनी पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, अपक्ष आघाडी चे गटनेते कैलास बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे.

शहरातील काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करत त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर चांगले विचार आणि काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्यास आपण देखील सकारात्मक असल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.