BJP state president Chandrakant Patil's criticism on Deputy Chief Minister Ajit Pawar

स्वत: बरोबर मिळवलेले २८ आमदार अजित पवार राखू शकले नाहीत. आता हे उर्वरीत आमदार कोठून मिळवणार असे म्हणत चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उडवली आहे.

पुणे : मराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकारणातल्या दोन दादांची जबरदस्त जुगलबंदी पहायला मिळत आहे. भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येणार असल्याचा गौप्यस्फोट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुराळा उडवून दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना सणसणीत टोला लगवाला आहे.

स्वत: बरोबर मिळवलेले २८ आमदार अजित पवार राखू शकले नाहीत. आता हे उर्वरीत आमदार कोठून मिळवणार असे म्हणत चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उडवली आहे.

एक जण म्हणतो पुन्हा येईन…दुसरा म्हणतो परत जाईन…एकाला पुन्हा येणं काही जमलं नाही. आता हे म्हणताहेत पुन्हा जाईन. अरे, तुम्हाला पुण्यात बोलावलं कुणी होतं?”, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकात पाटील यांच्या सह विरोधे पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेलाही चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

मी कोल्हापूरला (परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरून जाऊ नये. माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.