खोटं बोलण्याचाच पवारांचा राजकीय इतिहास; भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

पुण्यातील पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी भाजपचे राज्यात सरकार कधी येणार या प्रश्नावर ' नया साल नई उमंग' असे नमूद केले. विधीमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात पाटील म्हणाले, ‘‘ या पाच दिवसांच्या अधिवेशनात समाजाचा कुठलाच प्रश्न मार्गी लागलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने फक्त बहुमताच्या जोरावर स्वतः च्या फायद्याचे विद्यापीठ सुधारणा कायद्यासह १९ विधायके मंजूर करून घेतली आहेत.

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन्याची ऑफर दिली होती असे शरद पवार कितीही सांगत असले तरी, पवारांचा आजवरचा राजकीय इतिहास हा खोटं बोलण्याचाच राहिला आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

    पुण्यातील पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी भाजपचे राज्यात सरकार कधी येणार या प्रश्नावर ‘ नया साल नई उमंग’ असे नमूद केले. विधीमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात पाटील म्हणाले, ‘‘ या पाच दिवसांच्या अधिवेशनात समाजाचा कुठलाच प्रश्न मार्गी लागलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने फक्त बहुमताच्या जोरावर स्वतः च्या फायद्याचे विद्यापीठ सुधारणा कायद्यासह १९ विधायके मंजूर करून घेतली आहेत. पेपर फुटी, वीज बील माफीवर सभागृहात चर्चा केली गेली नाही. केवळ ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या गेल्या. ’’

    विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही नियमबाह्य पद्धतीने पुढे रेटण्याचा महाविकास अाघाडीचा प्रयत्न पण आम्ही तो हाणून पाडला. यावेळी सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून दमबाजीचाही प्रयत्न केला. पण राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा ज्या नेत्याच्या सल्ल्याने हे आघाडी सरकार चालते, त्या रिमोट कंट्रोलने फोन करून राष्ट्रपती राजवट लागेल अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्ष निवड न करता अधिवेशन गुंढळण्यात आल्याचा दावाही पाटील यांनी केला. नितेश राणे कारवाई प्रकरणी बोलताना पाटील यांनी, पोलिसांवर कोण दबाव टाकतंय, तिथल्या एसपीना कोण फोन करतंय? हे सर्वांना ठाऊक आहे, पण राणे या सगळ्यांना पुरून उरतील असे म्हणाले.