फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचे अपघातात निधन

आग विझल्यानंतर प्रकाश हसबे पहाटे घरी जायला निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दुर्देवी  निधन झाले. कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना रस्त्यातवर त्यांचा अपघात  झाला.

    पुणे: कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला लागलेली आग विझवून घरी निघालेल्या, कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रकाश हसबे असे मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अग्निशमन दलाचे प्रमुख होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागली. त्यानंतर कॅम्प सहीत पुणे शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. ही आग विझवण्यासाठीच्या सगळ्या मोहीमेत हसबे पुढे होते.

    आग विझल्यानंतर प्रकाश हसबे पहाटे घरी जायला निघाले. मात्र रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात दुर्देवी  निधन झाले. कर्मचाऱ्यांना दोन तासात पुन्हा कामावर परत येतो असे सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून जात असताना रस्त्यातवर त्यांचा अपघात  झाला.

    फॅशन स्ट्रीटला “आग लागल्यानंतर आम्ही लगेचच फायर ब्रिगेडला कळवले. मात्र जवळपास दीड तासाने फायर ब्रिगेड इथे दाखल झाले. त्यामुळे जास्त नुकसान झाले आहे, या ठिकाणी कोणती खाऊ गल्ली नाही. साधी चहाची टपरी देखील नाही. त्यामुळे इथे आग लागली तरी कशी हा प्रश्न आहे. आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे”

    अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.