चंद्रकांत पाटलांनी केली शरद पवारांची कॉपी, पण दादा पाऊस सर्वांवर मेहेरबान होतोच असं नाही

पुण्यातील नवी पेठेत सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे नामकरण सामाजिक कार्यकर्ते सुरेश आप्पा माळवदकर चौक करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील भाषण करत असताना पाऊस आला. मात्र त्यांनी पाऊस पडू लागल्यानंतरही मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भर पावसामध्ये चंद्रकांत पाटील भाषण देत होते. बाजूला त्यांच्या मागेच एक व्यक्ती छत्री घेऊन उभी होती तर मंचावरील खुर्चांवर बसलेल्या काही मान्यवरांनाही डोक्यावर छत्री पकडली होती. मात्र चंद्रकांत पाटील हे पावसामध्ये भिजतच भाषण देत होते.

    पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातली भर पावसातली प्रचारसभा अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. हीच सभा राष्ट्रवादीसाठी मैलाचा दगड ठरली होती. पवारांच्या या भाषणामुळेच राष्ट्रवादीची विधान सभेतील सदस्यसंख्या देखील वाढली असं म्हटलं जातं. आता शरद पवारांची कॉपी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात भर पावसात भाषण ठोकलं. चंद्रकांत पाटील यांचा हा भर पावसातील भाषणाचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल झाला आहे.

    पुण्यातील नवी पेठेत सेनादत्त पोलीस चौकीसमोरील चौकाचे नामकरण सामाजिक कार्यकर्ते सुरेश आप्पा माळवदकर चौक करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील भाषण करत असताना पाऊस आला. मात्र त्यांनी पाऊस पडू लागल्यानंतरही मध्येच भाषण न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. भर पावसामध्ये चंद्रकांत पाटील भाषण देत होते. बाजूला त्यांच्या मागेच एक व्यक्ती छत्री घेऊन उभी होती तर मंचावरील खुर्चांवर बसलेल्या काही मान्यवरांनाही डोक्यावर छत्री पकडली होती. मात्र चंद्रकांत पाटील हे पावसामध्ये भिजतच भाषण देत होते.

    १८ ऑक्टोबर २०१९ ला शरद पवारांनी भर पावसात सातारा या ठिकाणी सभा घेतली होती. पाच ते सहा मिनिटांच्या त्यांच्या भाषणाने त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सगळा नूरच पालटून टाकल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं, ज्या प्रमाणे वरुण राजा शरद पवारांवर मेहेरबान झाला त्या प्रमाणे सर्वांवर सर्वांवर मेहेरबान होतोच असं नाही.