इंधनाच्या करावर राज्य चालवायचे म्हणून विरोध करता तर लखनऊला का गेला नाहीत ? चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्र्याना सवाल!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, जीएसटीच्या भुमिकेवरून पवारांचा चेहरा उघड झाला. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा हवा आहे. त्याच्यावर राज्य चालवायचे आहे. तुम्ही का विरोध करता, लखनऊला का गेला नाहीत असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

  पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात मानाच्या गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी ‘मला माजी मंत्री म्हणू नका’ या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे सांगत खुलासा केला. शिवाय जीएसटीच्या भुमिकेवरून पवारांचा चेहरा उघड झाला. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा हवा आहे. त्याच्यावर राज्य चालवायचे आहे. तुम्ही का विरोध करता, लखनऊला का गेला नाहीत असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारत त्यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वस्तु आणि सेवा कराबाबतच्या भुमिकेवर टिका केली आहे.

  हे दुसऱ्या नेत्यासाठी केलेले वक्तव्य

  चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला माजी मंत्री म्हणू नका हे दुसऱ्या नेत्यासाठी केलेले वक्तव्य होते मात्र याची क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आली. माझ्या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली. पण माझा असा कोणताही हेतू नव्हता. तसेही एखाद्या वक्तव्याने फारसे नुकसान होत नसेल तर बोलायला हरकत नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. आपल्याला कोणी राज्यपाल करतय, कोणी केंद्रीय मंत्री करतय, यामुळे खूप बरे वाटते असेही ते म्हणाले.

  विरोध करता तर लखनऊला का गेला नाहीत?

  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, जीएसटीच्या भुमिकेवरून पवारांचा चेहरा उघड झाला. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा हवा आहे. त्याच्यावर राज्य चालवायचे आहे. तुम्ही का विरोध करता, लखनऊला का गेला नाहीत असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे की पिंपरी चिंचवडचे हे समजत नाही. ते कोरोना काळात राज्यात बाहेर कुठे गेले. पिंपरी चिंचवडची महापालिका माझ्याच नेतृत्वाखाली होणार असे सांगून त्यांनी स्वत:ला लहान केले अशी टिका चंद्रकांत पाटील यांनी केली.

  लोकांचे नगरसेवकांवर नाही मोदींवर प्रेम

  चंद्रकांत पाटील म्हणाले की, कितीही माणसे पळवण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही. लोकांचे नगरसेवकांवर प्रेम नाही मोदींवर प्रेम आहे. त्यामुळे जाणाऱ्यांनी विचार करावा. तुम्हाला पुन्हा परतीची वाट नाही असा इशाराही त्यांनी दिला.