Fraud

मोहन कुलकर्णी हा दिल्लीत राजा शास्त्री नावाने वावरत होता. त्याने डॉक्युमेंट्री बणविण्याच्या बहाण्याने गंडा घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर त्याने त्याचे नाव राजशास्त्री वरून बदलून मोहन कुलकर्णी केले आहे. त्याच्यावर मुंबईतील एका पोलिस ठाण्यात अशाच पध्दतीचा गुन्हा दाखल आहे. कला, नाट्य तसेच संगित क्षेत्रात येऊ पाहणार्‍या नवोदीतांना व गरजूंना हेरून कुलकर्णी हा त्यांना वेगवेगळी स्वप्ने दाखवित.

    पुणे : तरूण-तरूणींना डॉक्युमेंट्रीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक करणार्‍या सराईताला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मोहन उर्फ राजाशास्त्री मनोहर कुलकर्णी (रा. शिवाजीनगर, पालघर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३४ वर्षीय तरूणीने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २० ऑक्टोंबर ते 16 डिसेंबर २०२१ या कालावधीत घडला.

    पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मोहन कुलकर्णी हा दिल्लीत राजा शास्त्री नावाने वावरत होता. त्याने डॉक्युमेंट्री बणविण्याच्या बहाण्याने गंडा घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर त्याने त्याचे नाव राजशास्त्री वरून बदलून मोहन कुलकर्णी केले आहे. त्याच्यावर मुंबईतील एका पोलिस ठाण्यात अशाच पध्दतीचा गुन्हा दाखल आहे.
    कला, नाट्य तसेच संगित क्षेत्रात येऊ पाहणार्‍या नवोदीतांना व गरजूंना हेरून कुलकर्णी हा त्यांना वेगवेगळी स्वप्ने दाखवित. ऑक्टोंबर २०२१ रोजी त्याने फिर्यादी तरूणीला भेटून तिला तिची डॉक्युमेंट्री बनवायचे स्वप्न दाखविले होते. तसेच कार गिफ्ट देण्याच्या बहाण्याने कुणलकर्णीने टॅक्सपोटी फिर्यादीकडून ९९ हजार २८३ रूपये तसेच तिच्या मामाकउन ९५ लाख ९४४ रूपये तर अन्य एकाकडून २९ हजार ९४४ रूपये असे २ लाख २५ हजार रूपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिस उपायुक्त पौर्णीमा गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागराज बिराजदार तपास करीत आहेत.