Crime In Pune : लहान मुले अमली पदार्थांच्या विळख्यात! पुण्यात गांजा ओढण्यावरून अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारीची घटना

तिघेही मित्र असून, ते कोंढवे धावडे परिसरात राहतात. व्यसन करण्याची सवय आहे. गांजा देखील ओढतात. दरम्यान जनी आई माता मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत तिघे गांजा ओढत बसले होते. गांजा ओढत असताना गांजावरून तिघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात जवळचा चाकू काढला व दोघांवर वार केले. यात दोघेही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. 

    पुणे : गांजा ओढण्यावरून अल्पवयीन मुलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना उत्तमनगर परिसरात घडली. या हाणामारीत एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या दोघांवर चाकूने वारकरून त्यांना गंभीर जखमी केले आहे. दरम्यान या भांडणात पुन्हा एकदा शहरातील अमली पदार्थाचा विळखा समोर आला असून, गांजा सहजरित्या भेटत असल्याचे देखील दिसू लागले आहे.

    याप्रकरणी चॉईस बेकरी जवळ राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन अल्पवयीन मुले जखमी झाली आहेत. उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही मित्र असून, ते कोंढवे धावडे परिसरात राहतात. व्यसन करण्याची सवय आहे. गांजा देखील ओढतात. दरम्यान जनी आई माता मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत तिघे गांजा ओढत बसले होते. गांजा ओढत असताना गांजावरून तिघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात जवळचा चाकू काढला व दोघांवर वार केले. यात दोघेही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.

    गांजावरून अल्पवयीन मुलामध्ये वाद झाल्याने मात्र चांगलाच गोंधळ या परिसरात निर्माण झाला होता. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.