प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

रविवारी दुपारच्या वेळी मुलीची आई भाजी आणण्यासाठी खाली उतरली होती. यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे आईने मी खाली जाऊन येते असे सांगून घराचा दरवाजा बाहेरुन लॉक केला.

पुणे : पुण्यातील कोथरुडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन वर्षांची लहान मुलगी (girl child) तीसऱ्या मजल्यावरील घरातून आपल्या आईला खाली वाकून पाहत होती. परंतु या चिमुरडीचा अचानक तोल गेला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. तीन वर्षीय लहान चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या मृत चिमुरडीचे नाव अविष्का विशाल कोळपकर असे आहे. कोळपकर कुटुंबीय पुण्यातील कोथरुडमध्ये वृंदावन सोसायटीमध्ये तीसऱ्या मजल्यावर राहतात. रविवारी दुपारच्या वेळी मुलीची आई भाजी आणण्यासाठी खाली उतरली होती. यावेळी अविष्का घरात खेळत होती. त्यामुळे आईने मी खाली जाऊन येते असे सांगून घराचा दरवाजा बाहेरुन लॉक केला.

काही वेळानंतर अविष्का आईला पाहण्यासाठी गॅलरीमध्ये गेली. गॅलरीमधून ती आईला पाहण्यासाठी खाली पाहत असताना अचानक चिमुरडीचा तोल गेला. अचानक तोल गेल्यामुळे तीसऱ्या मजल्यावरुन खाली पडली. त्यामुळे मुलीला गंभीर दुखापत झाली होती. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार मिळण्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होती. एकुलती एक मुलगीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.