पिपंळे खालसात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत

शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नागरिकांना बिबट्याचे दर्शन होऊ लागले असून परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याने येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे.

 शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नागरिकांना बिबट्याचे दर्शन होऊ लागले असून परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याने येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे. पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे सह या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देताना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. गेल्याकाही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांना कधी उसाच्या शेतात तर कधी ओढ्याच्या कडेला, रस्ताला, झाडांच्या आडोशाला बिबट्या दिसून आला आहे त्यामुळे येथील बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे. तर पिपंळे खालसा परिसरातील मुक्ताईनगर या परिसरात बिबट्याचे अनेक शेतकऱ्यांना  दर्शन झाले आहे. गणेश धुमाळ यांच्या उसाच्या शेतामध्ये बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले.

याबाबतीत वनविभागाच्या अनेक अधिकाऱ्यांशी नागरिकांनी वेळोवेळी फोन वरुन कल्पना देउन देखील कोणही या भागाकडे फिरकले नाही असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तर परिसरातील शेतकऱ्यांनी पिजंरा आणून लावला पण गेल्या आठ दिवसात बिबट्या पिजंरात देखील अडकला नाही, तसेच परिसरात भारनियमनामुळे रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांना रात्री विद्युतपंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. अशा वेळी रात्री एकटा शेतकरी जीव मुठीत धरून काम करत आहे तर अनेक शेतकरी बिबट्याच्या भीतीने पिकांना पाणी देत नाही त्यामुळे पाणी असूनही पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. तर याबाबत शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर ठिकाणी आमचे अधिकारी जाऊन आले असून तेथे पिंजरा लावला असून गरज पडल्यास अजूनही एखादा पिंजरा लावला जाईल असे मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.