नागरिकांना पडला कोरोना नियमांचा विसर; ओमायक्रॉनचा संसर्ग वाढण्याची भीती

ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात पुण्या मुंबईला येथे दररोज येजा करीत असतात. त्याच बरोबर हजारो भाविक पुरंदर तालुक्यातील जेजुरी, नारायणपूर, बालाजी मंदिर, भुलेश्वर मंदिर या ठिकाणी देव दर्शनाला येतात. भाविकांकडून मास्क, सॅनिटाईझरचाचा वापर होत नाही.

    सासवड : ग्रामीण व शहरी भागात सध्या मोठ्या प्रमाणात ओमायक्राॅन रुग्णांच संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात नागरिक कोरोना नियमांकडे डोळेझाक करीत असल्याने ओमायक्राॅनचा प्रादुर्भाव वाढायला वेळ लागणार नाही. याचा परिणाम म्हणजे पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

    ग्रामीण भागातील विद्यार्थी, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात पुण्या मुंबईला येथे दररोज येजा करीत असतात. त्याच बरोबर हजारो भाविक पुरंदर तालुक्यातील जेजुरी, नारायणपूर, बालाजी मंदिर, भुलेश्वर मंदिर या ठिकाणी देव दर्शनाला येतात. भाविकांकडून मास्क, सॅनिटाईझरचाचा वापर होत नाही. बाजारपेठांमध्ये देखील हीच अवस्था असल्याने रुग्ण वाढीला वेळ लागणार नाही.

    भाजी मंडईत सोशल डिस्टन्सचा फज्जा

    सासवड सारख्या शहरात दररोज हजारो नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. भाजी मंडईत कोणत्याही प्रकारचा सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. तुफान गर्दीत भाजी खरेदी केली जाते. भाजीपाला खरेदी करताना महिलांसोबत लहान मुले देखील असतात. त्यांची काळजी घेतली जात नाही. ओमायक्रॉन सारखा आजार फोफावत असताना काळजी घेणे गरजेचे असताना नागरीक बेफिकीर होऊन वावरत आहेत.
    हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला याचे रुग्ण वाढत आहेत. सध्या शासनाने लसिकरण मोहीम हाती घेतली असून त्याला प्रतिसाद मिळत आहे.