पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले; २४ तासात १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद; नवीन ११८७ रुग्ण वाढले

शहराच्या विविध भागातील ११८७ आणि महापालिका हद्दीबाहेरील २ अशा ११८९ नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक १८६ आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत १८३ नवीन रुग्ण सापडले आहेत.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढायला लागले आहे. १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, शहराच्या विविध भागातील ११८७ आणि महापालिका हद्दीबाहेरील २ अशा ११८९ नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक १८६ आणि ‘ड’ कार्यालय हद्दीत १८३ नवीन रुग्ण सापडले आहेत.

    उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील ११ आणि महापालिका हद्दीबाहेरील ५ अशा१६ जणांचा आज मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जेष्ठ व्यकतीचा सर्वाधिक समावेश होता.

    मागील चोवीस तासात दोन मृत्यू झाले असून आधी मृत झालेल्या केसेस असल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. शहरात आजपर्यंत १ लाख २३ हजार ५५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १ लाख१० हजार४०४ जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील १९२३ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या ८०७अशा २७३०जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १८८३ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, २११० जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत ९६ हजार १४९ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात ३७१० लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.