antibodies can not give you an confirm assurance to avoid reinfection of corona says expert nrvb

इंग्लंडहून परतलेल्या २१५ प्रवाशांचा शोध घेण्यात आला असून, १६७ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील ११२ जणांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला असून, दोन जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ५३ जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.

पिंपरी: शहरात इंग्लंडहून परतलेल्या २१५ प्रवाशांचा शोध घेण्यात आला असून, १६७ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील ११२ जणांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला असून, दोन जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ५३ जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग कमी होत आहे. मंगळवारी १२१ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६,३१६ झाली. तर दिवसभरात १५६ जण कोरोनामुक्त झाले. १७९० संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १,४०१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.

शहरात मंगळवारी दिवसभरात तीन रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील एक रुग्ण दगावला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १,७५२ तर महापालिका हद्दीबाहेरील ७२२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. मंगळवारी दिवसभरात १,११० जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १,८२३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६४४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.