तळेगाव ढमढेरेत कोरोनाचा तिसरा बळी

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांची माहिती

 शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)  येथे मार्च मध्ये एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू तसेच जुलै महिन्यात एका इसामचा कोरोनाने मृत्यू झालेला असताना आता पुन्हा तळेगाव ढमढेरे येथील एका पंचेचाळीस वर्षीय कोरोनाबाधित इसमाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)  येथील सदर इसम आजारी असल्याने त्या इसमावर तळेगाव ढमढेरे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले. त्यांनतर सदर इसमामध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्यानंतर सदर इसमावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. त्या ठिकाणी सदर इसमाची कोरोना तपासणी केली असता त्या इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  तर दरम्यान सदर इसमाची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाईन करत सदर कोरोनाबाधित इसमावर पुणे येथे उपचार सुरु करण्यात आले होते.  त्यांनतर उपचार सुरु असताना रात्री एक वाजण्याच्या सुमारास सदर कोरोनाबाधित इसमाचा मृत्यू झाला आहे. तळेगाव ढमढेरेत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. तर यापूर्वी तळेगाव ढमढेरे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात असताना अचानकपणे एका इसमाला कोरोनाची बाधा होऊन त्याच्या घरातील काही व्यक्ती बाधित झाले असताना त्याच घरातील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे तळेगाव ढमढेरे येथील कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या तीन झाली आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.