महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिलीजुली जनतेपर्यंत पोहोचविणार – सचिन साठे

सर्व पराधिका-यांनी आपआपल्या भागात बुथ कमिट्या व वॉर्ड कमिट्या लवकरात लवकर स्थापन कराव्यात. त्याचा अहवाल पक्षाकडे द्यावा. शहरातील आपआपल्या भागातील जनतेचे प्रश्न, गोर-गरिबांच्या समस्या अधिक आक्रमकपणे प्रशासनासमोर मांडाव्यात. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा.

    पिंपरी: सर्वसामान्य जनतेच्या करातून आलेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिजोरी भरली जाते. या कररुपी पैशाचा जो कोणी अपहार करीत असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्याचा भ्रष्टाचार जनतेसमोर मांडून त्या विरोधात लढा उभारा, असे आवाहन पिपंरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच, महापालिकेतील भ्रष्टाचाराची मिली जुली जनतेपर्यंत पोहोचविणार काम करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

    पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठक रविवारी प्राधिकरण आकुर्डी येथे पार पडली. मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या दृष्टीने काँग्रेसने कामाला लागणे गरजेचे आहे. सर्व पराधिका-यांनी आपआपल्या भागात बुथ कमिट्या व वॉर्ड कमिट्या लवकरात लवकर स्थापन कराव्यात. त्याचा अहवाल पक्षाकडे द्यावा. शहरातील आपआपल्या भागातील जनतेचे प्रश्न, गोर-गरिबांच्या समस्या अधिक आक्रमकपणे प्रशासनासमोर मांडाव्यात. सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले