वाळूचे बेकायदा उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणा-या १६ जणांवर गुन्हा ; इंदापूर पोलीसांची कारवाई

पोलीस नाईक अप्पाजी सोपान दराडे यांनी त्यांच्या विरुध्द दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने आरोपींवर गु.र.क्र.२५० /२०२१ नुसार भा.दं.वि. कलम ३५३,३७९,३४ सह पर्यावरण अधिनियम ९,१५ सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ४, गौण खनिज अधिनियम कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार तेजस मोहिते पुढील तपास करत आहेत.

    इंदापूर : वाळूचे बेकायदा उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणा-या १६ जणांवर इंदापूर पोलीसांनी गुन्हे करुन त्या पैकी सहा जणांना अटक केली.वाहने व वाळू असा २७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.मंगळवारी (दि.२४) रात्री बारा ते दोन वाजण्याच्या दरम्यान उजनी पाणलोट क्षेत्रातील हिंगणगाव ते कांदलगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

    या कारवाईत शरद किसन तोबरे(वय २९ वर्ष रा. सरडेवाडी ता. इंदापूर),विजय राजेंद्र रजपुत (वय २० वर्षे रा.आंबिकानगर, इंदापूर),सुधीर दिगंबर यादव (वय २८ वर्षे रा.बेडशिंगे ता.इंदापूर), आमीन रशीद शेख(वय ३८ वर्षे),  दत्ता महादेव मसकुटे (वय २५ वर्षे),शिवाजी शंकर मोरे (वय ३८ वर्षे,तिघे रा.पानगाव ता.बार्शी जि.सोलापूर) यांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आण्णा कल्याण देवकर (रा. हिंगणगाव ता.इंदापूर),पंकज खबाले पुर्ण नाव पत्ता माहित नाही (ता.इंदापूर),अक्षय नाईक (रा.निमगाव केतकी ता.इंदापूर), आबा देवकाते,दीपक रायकर, नागेश राखुंडे (तिघे रा. कांदलगाव,ता.इंदापूर),विशाल जगताप (रा. हिंगणगाव,ता. इंदापूर),लाला मोरे पुर्ण नाव माहित नाही (रा.पानगाव,ता. बार्शी जि.सोलापूर) व एम एच बी १७४७ या क्रमांकाच्या वाहनावरील अज्ञात चालक व वाळु उत्खनन करणा-या अज्ञात बोट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.