NCPच्या कार्यालयाच्या उद्धाटन कार्यक्रमास उपस्थित  नियम मोडणाऱ्या १०० हून पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोरोनाबाबत घालून देण्यात आलेल्या नियमांना फाटयावर मारत उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता.

    पुणे: शहरातील टिळक रोडवर उभारलेल्या शहर राष्ट्रवादी काँग्रेस भवनांच्या भव्य वास्तूचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला, मात्र या कार्यक्रमात कोरोनाबाबत घालून देण्यात आलेल्या नियमांना फाटयावर मारत  हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता.

    विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करतात. पण त्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमावली पायदडी कशा तुटवल्या जावू शकतात? असा सवाल आता राज्यभरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. अशातच आता NCPच्या कार्यालयाच्या उद्धाटनाची गर्दी भोवली आहे. १०० ते १५० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.