सामाजिक सुरक्षा पथकातील फौजदारावर निलंबनाची कारवाई

पिंपरी - चिंचवड पोलीसांकडून खातेनिहाय चौकशी सुरु होती. या चौकशीदरम्यान या प्रकरणातील साक्षीदार पिंपरी - चिंचवडला आले असता फौजदार चौगुले यांनी साक्षीदारांना धमकाविले. त्यामुळे चौगुले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांनी सांगितले.

    पिंपरी: भावावर दाखल झालेल्या गुन्ह्यात कोल्हापूरला जाऊन गोंधळ घालत या प्रकरणातील साक्षीदारांना धमकाविणाऱ्या प्रणील चौगुले असे निलंबित केलेल्या फौजदाराचे नाव आहे. पिंपरी – चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले.

    पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयात सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत आहेत. चौगुले यांच्या भावावर कोल्हापूर येथे एक गुन्हा दाखल आहे. फौजदार चौगुले यांनी तेथे जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे याप्रकरणात चौगुले यांची पिंपरी – चिंचवड पोलीसांकडून खातेनिहाय चौकशी सुरु होती. या चौकशीदरम्यान या प्रकरणातील साक्षीदार पिंपरी – चिंचवडला आले असता फौजदार चौगुले यांनी साक्षीदारांना धमकाविले. त्यामुळे चौगुले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांनी सांगितले.